फटाके फोडल्यावर जोरदार राडा २५ जणांवर गुन्हा दाखल कल्याणतील घटना...
कल्याण : अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नागरीकांकडून जल्लोष साजरा केला गेला. मात्र कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन वाद झाल्याने गालबोट लागले आहे.
कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लाबल रुग्णलयासमोर काही तरुण फटाके फोडत असताना वाद झाला. दोन गट आमने सामने आले. या गटामध्ये वाद सुरु असताना मध्यस्थी करण्यासाठी तिसरा गटही आला. या तिन्ही गटात नंतर जोरदार राडा सुरु झाला. जवळपास अर्धा पाऊण तास हा राडा सुरुच होता. या राड्या दरम्यान काही तरुण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसानी तीनही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी २५ जणांना आरोपी केले आहे. पुढील तपास सुरु आहे.
Post a Comment
0 Comments