Type Here to Get Search Results !

आझम कॅम्पस येथे पुण्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन...

आझम कॅम्पस येथे पुण्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन...
 
पुणे :- प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे निवृत्त विभागीय आयुक्त (पुणे), मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात  आले. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी 'चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, सचिव प्रा.इरफान शेख, शाहिदा सय्यद, शाहिद इनामदार, डॉ अरिफ मेमन, डॉ एन वाय काझी, कादिर कुरेशी, असिफ इनामदार यांच्यासह विविध संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक शिक्षक वर्ग, विद्यार्थी  उपस्थित होते. 
संचलन,आकर्षक क्रीडा प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.चित्र प्रदर्शनाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

आझम कॅम्पस च्या व्ही. एम. गनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे  दि.२६ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा सोहळा उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments