Type Here to Get Search Results !

'टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षा सादर - पुष्पक बरीक यांची पत्रकार परिषदेत माहिती; 'टीव्हीएस किंग का वादा' योजनेचाही शुभारंभ...

'टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षा सादर - पुष्पक बरीक यांची पत्रकार परिषदेत माहिती; 'टीव्हीएस किंग का वादा' योजनेचाही शुभारंभ...

पुणे :- "ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी टीव्हीएस मोटर्स लिमिटेडने नवीन वैशिष्ट्यपुर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या २२५ सीसी क्षमतेचे लिक्वीह कुल्ड इंजिन असलेली 'टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षा ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. 'हर रस्ते का हमसफर' असलेल्या ऑटोरिक्षामध्ये आजवर न अनुभवलेले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. अधिक शक्तिशाली, नवतंत्रज्ञानयुक्त, वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे. यासह 'टीव्हीएस किंग का वादा' या योजनेचा शुभारंभ आज करत आहोत," अशी माहिती टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे प्रमुख पुष्पक बरीक यांनी दिली.

पुणे स्टेशन येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमिअरमध्ये टीव्हीएस मोटर्सच्या वतीने 'टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुष्पक बरीक बोलत होते. याप्रसंगी टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक (विक्री) शिवानंद लामदाडे, विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई, श्रीगणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित, शाह आटोचे हरून शाह, सार्थक ऑटोचे सुनील बर्गे, रिदम ऑटोचे नीरज शाह, अनया ऑटोचे अजित भोईटे यांच्यासह विविध फायनांस कंपन्या व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

पुष्पक बरीक म्हणाले, "दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये टीव्हीएस एक अग्रणी आणि नामांकित कंपनी आहे. आजवर दर्जेदार वाहनांचे वितरण कंपनी करत आली आहे. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लसच्या रूपाने अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिक्षा बाजारात आली आहे. यामध्ये वाहनचालक आणि ग्राहकांसाठी उत्तम व्यवस्था, आरामदायक बैठक क्षमता, चांगले सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आले आहे. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लसला २२५ सीसीचे इंजिन आहे. तसेच भरपूर कालावधीसाठी वापर आणि उच्च मायलेज (इंधनक्षमता जास्त आहे.) ही ऑटोरिक्षा सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल या तीनही प्रकारांत उपलब्ध आहे."

"टीव्हीएस मोटार कंपनी वाहन निर्मिती व्यवसायात अतिशय उत्कृष्ठ दर्जाची दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी व वाहनांच्या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर कार्यरत असलेली कंपनी आहे. जगातील ३० पेक्षा जास्त देशांना या वाहनांची निर्यात केली जाते. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस आज भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पसंतीला खरी उतरलेली असून, त्याचा स्विकार संपूर्ण जगात झालेला आहे. मागील १० वर्षापासून कंपनीने १० लाखापेक्षा जास्त तीनचाकी वाहनांची विक्री केली आहे. सध्या कंपनी भारतामधील १०० विविध शहरांमध्ये आणि जगभरातील ३० देशांमध्ये वाहनांचे सुटे भाग आणि आवश्यक सेवा पुरवित आहे," असेही बरीक यांनी नमूद केले.

टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्सची किंमत रु. २,५७,२४९/- (एक्स-शोरूम) आहे. श्रीगणेश ऑटो (स्वारगेट), शाह ऑटो (मंगळवार पेठ), अनया मोटो (मांजरी), रिदम ऑटो (हिंजेवाडी) आणि सार्थक ऑटो (चिंचवड) या अधिकृत डिलर्सकडे या रिक्षाची खरेदी करता येणार आहे. सोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदीकरिता आकर्षक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'टीव्हीएस किंग का वादा' या योजनेत दोन वर्षांची वारंटी, चार मोफत सर्व्हिसिंग, एक वर्ष मोफत रोडसाईड सहायता आणि १० लाखाचा अपघाती विमा या सुविधा देण्यात येणार आहेत, असे शिवानंद लामदाडे यांनी सांगितले. 

टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लसची वैशिष्ट्ये :
- सर्वोत्तम तंत्रज्ञान, मायलेज देणारे शक्तिशाली २२५ सीसी लिक्विड कुल्ड ड्युरेलाईफ इंजिन
- एलईडी हेड लॅम्प व इंडिकेटर्स
- प्रवासी बैठक आसनाचा आकार मोठा
- ट्युब्लेस टायर्स, ऑल गियर स्टार्ट
- ड्युअल रेटेड सस्पेन्शन, ड्युरेबल रीड ड्रम ब्रेक
- दोन वर्षांची, एक लाख किलोमीटरपर्यंत वारंटी 
- कमी देखभाल दुरुस्तीची गरज, खर्चाची बचत 
- मोबाईल चार्जिगच्या स्वतंत्र सॉकेटची सोय


 'टीव्हीएस किंग का वादा'ची वैशिष्ट्ये:
- दोन वर्षांपर्यतची वारंटी
- मेंटेनेंसपासून मुक्तता, चार मोफत सर्व्हिसिंग
- एक वर्ष मोफत रोडसाईड सहायता
- १० लाखाचा अपघाती विमा

Post a Comment

0 Comments