पुणे :- बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि लोकप्रिय अभिनेत्री जयाप्रदा यांच्या आधार चित्रपटात महत्त्वाची भूमिका करणारा ' आणि अनेक पुरस्कारांची मोहोर उमटवलेला 'घुसमट' चित्रपटातून तसेच 'तिरुपती बालाजी' ,श्रीकृष्ण, 'चक्रधर स्वामी', 'दुनियादारी', महानगर इ.मालिकांमधून दोन दशकांहुन अधिक सिने-मालिका क्षेत्रात काम करत असलेला अभिनेता अमोल भोसले आज अचानक 'रंग अबोली' या मराठी सिनेमातील त्याच्या भूमिकेच्या निमीत्ताने चर्चेत आला आहे.
अमोल भोसले या सिनेमात राहुल नावाच्या एका क्रिझोफेनिक तरुणाची भूमिका साकारत आहे. एखादी घटना घडून गेल्यावर त्या तरुणाला कळत नाही की आपल्याकडून काय घडले. त्या ठराविक क्षणानंतर तो एवढा नॉर्मल होतो की जसे काही घडलेच नाही, कारण आपण काय केले याची त्याला जाणीवच नसते.
अमोल पुढे सांगतो की, आजवर मी अनेक धार्मिक आणि पौराणिक महान पुरुषांच्या व देवदेवतांच्या भूमिका केल्या होत्या. अशा प्रकारची अगदीच विरोधाभास असलेली भूमिका करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. त्यासाठी मी अनेक अशा प्रकारच्या लोकांना भेटलो, जाणून घेऊन समजून घेतले. परंतु पुण्यातील एक प्रसिद्ध डॉक्टर यांच्या एका वाक्याने माझी दिशा बदलली ती म्हणजे हे रुग्ण एका ठराविक पॅटर्न ने वागत नाहीत, त्यामुळे मला माझ्या भूमिकेसाठी स्वातंत्र्य मिळाले. या सिनेमात माझ्यासोबत तेजस्विनी पंडित, शरद पोंक्षे, गिरीश परदेशी, माधव अभ्यंकर, अंगद म्हसकर अशा बड्या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
निशिकांत महाबळ (मालक) प्रस्तुत, रावसाहेब वंदुरे, संजय चौगुले निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन भास्कर यांचे कसदार दिग्दर्शन, समीर भास्कर यांचे छायाचित्रण असलेल्या या चित्रपटाला चंद्रकांत कागले यांचे आहे संगीत लाभले आहे.
'रंग अबोली' हा चित्रपट १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Post a Comment
0 Comments