Type Here to Get Search Results !

शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त तर विजयकुमार मगर यांची पोलीस उपायुक्त झोन-4 म्हणून नियुक्ती...

शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त तर विजयकुमार मगर यांची पोलीस उपायुक्त झोन-4 म्हणून नियुक्ती...

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र):- लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभुमीवर शहरातील 2 पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची झोन-4 चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झोन-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.


वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ?

विजयकुमार मगर हे स्वभावाने अतिशय कडक होते. त्यांनी अनेकांना चुक केल्या बरोबर कंट्रोल रूम नाहीतर निलंबित केले होते. त्यांची कर्मचाऱ्यांवर चांगली वचक होती. त्यांची बदली झाल्याचे कळाल्यावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाल्याचे समजले आहे.

Post a Comment

0 Comments