Type Here to Get Search Results !

रिपॉस एनर्जीच्या संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा पुरस्कार प्रदान ; डिझेल वुमन म्हणून लवकरच होणार ओळख निर्माण...

रिपॉस एनर्जीच्या संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा पुरस्कार प्रदान ; डिझेल वुमन म्हणून लवकरच होणार ओळख निर्माण...

पुणे : रिपॉस एनर्जीच्या संस्थापक आणि चीफ व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले वाळुंज यांचा अद्वितीय अशा २५ महिला उद्योजकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या रिपॉस एनर्जी या एनर्जी डिस्ट्रिब्युशन फ्युएल डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला रतन टाटा यांनी साह्य केले आहे. या २५ महिला उद्योजकांना माननीय राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन संवाद साधता आला. ‘द प्रेसिडंट विथ द पीपल’ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती भवनात ही भेट झाली. आघाडीच्या महिला उद्योजकांसोबत अधिक दृढ संबंध निर्माण करून त्यांच्या लक्षणीय कार्याचा यथोचित सन्मान करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अदिती भोसले वाळुंज, यांनी आपला राष्ट्रपती यांना भेटल्यानंतरचा अनुभव पत्रकारांना सांगितला.

अदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी २०१७ साली रिपॉस एनर्जीची स्थापना केली. जगभरातील ऊर्जावितरणात आमूलाग्र बदल करण्याच्या हेतूने ‘डोअरस्टेप फ्युएल डिलिव्हरी’ क्षेत्रात कार्यरत अशी ही अग्रणी कंपनी आहे. ऊर्जेचा पुरवठा आणि मागणी यातील दरी भरून काढण्यासाठी या व्यासपीठावर तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण पर्यायांचा वापर केला जातो. राष्ट्रपतींसोबत खास संवाद साधणाऱ्या व्यक्तींमध्ये अदिती यांची निवड होणे ही त्यांच्या अप्रतिम नेतृत्व आणि ऊर्जा वितरण क्षेत्रात बदल घडवण्याची त्यांची बांधिलकी यांचे प्रतिक आहे.
भारतातील उद्योगजगतात बदलात्मक परिणाम साधणाऱ्या या उद्योजिकांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. विशेषत: ‘स्टार्ट-अप इंडिया’ उपक्रमात या उद्योजिकांनी मोठा सहभाग नोंदवला आहे, असे त्यांनी नमूद केले. या भेटीत राष्ट्रपती मुर्मू यांनी या उद्योजिकांचा आजवरचा प्रवास आणि त्यांचे यश नमूद करताना म्हटले की या महिला देशासाठी विशेषत: महिला आणि तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. टेक स्टार्टअप ते सामाजिक संस्था अशा विविध क्षेत्रातील या महिलांनी भारतीय स्त्रीमधील बहूविध क्षमतांचे प्रदर्शन केल्याचे त्या म्हणाल्या. या महिलांचे कार्य फक्त आर्थिक विकासापुरते मर्यादित नाही तर त्यांनी पारंपरिक जोखडातून मुक्त होत लिंगाधारित नव्हे तर क्षमता आणि महत्त्वाकांक्षांच्या आधारावर एक नवे सर्वसमावेशन आर्थिक भविष्य रचण्याचा नवा मार्ग आखला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. या महिला फक्त उद्योजिका नाहीत तर त्या बदलाच्या प्रणेत्या आहेत, प्रगती आणि विकासाच्या मार्गावर जाऊ इच्छिणाऱ्या लाखो तरुण महिलांच्या प्रेरणास्थान आहेत, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले.
या सन्मानाविषयी रिपॉस एनर्जीच्या संस्थापक आणि चीफ व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले वाळुंज म्हणाल्या, “रिपॉस एनर्जीसाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीचे कौतुक माननीय राष्ट्रपतींनी करावे हा आमच्यासाठी फार मोठा सन्मान आहे. ऊर्जा वितरणात बदल घडवणे आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याला आकार देण्यात आपला वाटा उचलण्याची आमची बांधिलकी या सन्मानामुळे अधिक दृढ झाली आहे. या भेटीतून महिलांना प्रोत्साहन देण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. तसेच, अधिकाधिक महिला उद्योजकांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रगती आणि विकासात त्यांना साह्य करण्याचीही जाणीव यामुळे झाली आहे.”
रिपॉस एनर्जीमध्ये आजघडीला ३५० हून अधिक मनुष्यबळ आहे तर भारतातील ३०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत या कंपनीसोबत २००० हून अधिक भागीदार जोडले गेले आहेत. रेपोसच्या माध्यमातून आजवर १२ कोटी लिटर्स इंधन वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे ४१ दशलक्ष किलो इतके कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे.

डिझेल वुमन म्हणून लवकरच होणार ओळख निर्माण...
ज्या पद्धतीने सध्या आता देशभरात त्यांचे काम सुरू आहे तर त्यांची डिझेल वुमन म्हणून ओळख निर्माण व्हायला जास्त वेळ लागणार नाही. लवकरच ते देशभरात डिझेल वुमन या नावाने त्यांची ओळख निर्माण होईल.

Post a Comment

0 Comments