पुणे :- बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल, अमनोरा या अत्याधुनिक शाळेतर्फे विद्यार्थी, पालक आणि पुणेकरांसाठी लिटफेस्ट या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वैचारिक चर्चा, सादरीकरणे आणि सृजनशील अभिव्यक्तीची समृद्ध सांगड घालण्यात आली आहे.
सीएआयई आणि सीबीएसई या जागतिक पातळीवर प्रख्यात असलेल्या दोन बोर्डांमधून शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल अमनोरा या शाळेला 'स्कूल ऑफ थॉट' तत्वज्ञानाचा पाया आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणामध्ये प्रत्येक विचार, कल्पना आणि प्रश्न याबद्दल जाणून घेण्याचे स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे हा या तत्वज्ञानाचा गाभा आहे.
हेच तत्वज्ञान पुढे नेत या मोहत्सवाचे शीर्षक 'लिटफेस्ट : अ फेस्टिव्हल ऑफ थॉट्स' असे निश्चित करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ व २० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वे आणि विद्यार्थी या ठिकाणी एकत्र जमले होते आणि या निमित्ताने बौद्धिक जाणीवा आणि सांस्कृतिक सोहळ्यासाठी एक मुक्त वातावरण तयार झाले होते.
लिटफेस्टमध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कादंबरीकार जेरी पिंटो यांनी सत्राचे औपचारिक उद्घाटन केले आणि बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल अमनोराच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रसिद्ध पत्रकार अफ्रिदा रहमान अली यांनी आपल्या पत्रकारितेचे अनुभव कथन केले तर अमर चित्र कथाचे ग्रुप आर्ट डिरेक्टर सॅव्हिओ मास्काऱ्हेनास आपल्या कलात्मक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले. कुशल अभिनेते आनंद गोराडिया आणि चिंतन राछ हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या साहित्यिक वातावरणात त्यांनी नाट्यमयतेची भर घातली.
या लिटफेस्टसाठी पुण्यातील पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी असे ८०० हून अधिक अभ्यागत उपस्थित होते. कला, नाटक आणि संगीताशी साहित्याची घातलेली सांगड दाखविणाऱ्या, कथांना जिवंत करणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित मग्न झाले होते. समकालीन साहित्यिक संकल्पनांबद्दल विचारांना खाद्य देणाऱ्या सत्रांसाठी या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. या निमित्ताने प्रोफोशनल्स आणि उदयोन्मुख गुणवंतांमध्ये चर्चेला चालना मिळाली.
तज्ज्ञांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यशाळांमध्ये विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. नाटक व रंगमंच तंत्रे, कथाकथन, कल्पक लिखाण, मूकाभिनय व अभिव्यक्ती इत्यादी विषयांचा यात समावेश होता. बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल अमनोरा आणि पुण्यातील इतर शाळांमधीलविद्यार्थ्यांनी आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
लिटफेस्ट २०२४ च्या यशावर प्रतिक्रिया देताना बिलाबाँग इंटरनॅशनल स्कूल, अमनोराच्या मुख्याध्यापक आदिती मुखर्जी म्हणाल्या, "बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्य साहित्यिक महोत्सवाला मिळालेले यश पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. या साहित्यिक मेळ्याच्या निमित्ताने पत्रकारिता, कला, अभिनय आणि साहित्यक्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकत्र आल्या होत्या. या महोत्सवातील प्रमुख पाहुणे म्हणजे जेरी पिंटो, अफ्रिदा रहमान अली, सॅव्हिओ मास्काऱ्हेनास, आनंद गोराडिया आणि चिंतन आर राछ यांनी या महोत्सवात आपले कार्यक्षेत्र उलगडून दाखवत उपस्थितांना समृद्ध केले. खुमासदार चर्चा, कथाकथन सत्रे आणि साहित्य कार्यशाळांमुळे बौद्धिकदृष्ट्या चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. ललित लेखन, मूकाभिनय, नाटक आणि अशा अनेक विषयांवरील समृद्ध करणारी सत्रे वेळापत्रकानुसार विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या कार्यशाळा संचालकांचे आम्ही कृतज्ञ आहोत. या महोत्सवाच्या घोषणेपासूनच आमच्या पालकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला."
Post a Comment
0 Comments