पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरजवळ दुचाकींचा अपघात ;अपघातात एकाचा मृत्यू...शिक्रापूर (पुणे) : पुणे-नगर रस्त्यावरील एल ॲन्ड टी फाट्याजवळ नगरकडून पुण्याला जाणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. गणेश काशीनाथ जाधव (वय ३६, रा.सणसवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दोघांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश जाधव याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर दुचाकीचालक रोशन धनसिंग तमत्ता (रा. सणसवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत नागेश मारुती भिसे (रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.
Post a Comment
0 Comments