उल्हासनगर (प्रतिनिधी) : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उल्हासनगर शहाराध्यक्षपदी संजय घुगे यांची सोमवारी नियुक्ती केली. तसेच सचिन बेंडके, मुकेश सेजपालनी, रवी पाल, सागर चव्हाण व शैलेश पांडव यांची उपशहर अध्यक्ष तर ऍड अनिल जाधव यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उल्हासनगर दौऱ्यावेळी टॉउन हॉल येथील एका कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ६ महिन्यांपूर्वी शहर कार्यकारणी बरखास्त करून पक्ष पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता. तसेच एका आठवड्यात नवीन शहाराध्यक्षसह अन्य पदाधिकार्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यापासून शहाराध्यक्ष पदासह अन्य पदाधिकर्यांच्या नियुक्तीला मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर सोमवारी माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांची पुन्हा शहाराध्यक्ष पदी नियुक्ती करून, पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. नवनियुक्त शहाराध्यक्ष संजय घुगे यांनी सोमवारी सकाळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असून राज ठाकरे यांनी यावेळी घुगे याना शहाराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र दिले. महापालिका, लोकसभा व विधानसभा सार्वजनिक निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजय घुगे यांनी दिले. तसेच जुने व नवीन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेईन पक्षाची ताकद वाढविणार असल्याचे घुगे म्हणाले. यापूर्वी शहराध्यक्ष पदी असतांना चमकदार कामगिरी घुगे यांनी केली होती.
Post a Comment
0 Comments