पुणे : विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय पतीने २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार करत पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीने विमानतळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आराेपी हे पती व पत्नी आहेत. ३ डिसेंबर राेजी विमाननगर परिसरातील हाॅटेल बॅकस्टेज पती अशोक हा पत्नीला घेऊन गेला. तेथे गेल्यावर अशोक याने पत्नीला तुझे लफडे दुसऱ्या मुलाबराेबर आहे, असे बाेलून शिवीगाळ करुन मारहाण केली. यानंतर पीडित महिला हाॅटेलमधून निघून बाहेर थांबली असता, पतीने पुन्हा बाहेर येत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच 'आता तुला साेडत नाही, खल्लास करताे' असे म्हणून स्वतःकडे असलेल्या चाकूने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पत्नीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पती अशोक आढाव याला अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक देशमुख करत आहेत.
Post a Comment
0 Comments