Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

मुलाने आईच्या अपमानाचा घेतला बदला ; सराफावर केले कोयत्याने वार...

मुलाने आईच्या अपमानाचा घेतला बदला ; सराफावर केले कोयत्याने वार...

पुणे : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. युवराज अनिल गोरखे (वय २४, रा.वैदूवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, याप्रकरणी त्याचा साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय विमलचंद मेहता (वय ३८, रा. कुमार कॅसल सोसायटी, कॉन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज (३९) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरखे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता. आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता. शनिवारी (२ डिसेंबर) रात्री सव्वानऊच्या सुमारास विजय यांना आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात अडवले. गोरखे आणि साथीदाराने त्यांच्यावर कोयता उगारला. विजय घाबरून पळाले. आरोपींनी पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रियंका शेळके तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments