ऐतिहासिक भीडेवाडा जमीनदोस्त ; पोलीस बंदोबस्तात रातोरात महापालिकेनी केली कारवाई...
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने भिडेवाड्याची जागा एक महिन्याच्या आत महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले होते. त्याची मुदत ३ डिसेंबर रोजी संपल्यानंतर भिडेवाडा रात्री पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आला.आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी 'मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती'च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. मात्र, १३ वर्षे हे प्रकरण न्यायालयात अडकले होते.
वाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. या स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता भिडेवाडा हा इतिहासजमा झाला आहे.
Post a Comment
0 Comments