Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

मेट्रोचे काम चालू असताना सापडले हातबाँम्ब ; बाणेर परिसरात खळबळ...

मेट्रोचे काम चालू असताना सापडले हातबाँम्ब ; बाणेर परिसरात खळबळ...

पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरात खोदकामात जुने हातबाँम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम सुरु आहे.

बाणेर परिसरातील आयशरच्या बाहेर खोदकाम सुरू असताना सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबाँम्ब (हँड ग्रेनेड) सापडले.

मेट्रो कामगारांनी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित बाँम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून या रोडवरील वाहतूक थांबवून ठेवली होती. बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला. बाँम्ब शोधक नाशक पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने बाँम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. यापूर्वी यापरिसरातील एका नाल्यात जुनी काही शस्त्रे सापडली होती.

Post a Comment

0 Comments