ठाकरे गटाला बसला मोठा धक्का ; पदाधिकाऱ्यांनी १५ दिवसांतच केला शिंदे गटात प्रवेश...
शिवसेनला सोडचिठ्ठी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दाखल झालेले भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी अवघ्या पंधरा दिवसात पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी काही गैरसमजातून संतोष कदम यांनी शिवसेना सोडून तडकाफडकी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे हर्षोल्हासित झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता. या घटनेची शिंदे गटाला भायखळ्यात सुरुंग लागल्याच्या मथळ्याखाली बातमीही छापून आली होती. मात्र ही बाब यशवंत जाधव यांना कळताच त्यांनी फोन करून कदम यांच्याकडे हा निर्णय घेण्यामागील कारण विचारले. त्यावेळी त्यांना याबाबत समजले त्यांनी वेळीच याबाबत संबंधित व्यक्तीला योग्य ती समज देऊन संतोष कदम आणि प्राची कदम यांच्या मनातली नाराजी दूर केली.
शिंदे हेच सामान्य शिवसैनिकाला न्याय देऊ शकतात
त्यामुळे आपण तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षात चुकीचा संदेश गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी यशवंत जाधव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा पुन्हा पक्षप्रवेश करून घेत त्यांना झाले गेले विसरून जात पुन्हा पक्षवाढीसाठी सक्रिय होण्यास सांगितले. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत ठाकरे गटात गेलेला पदाधिकारी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करून पुन्हा शिवसेनेमध्ये सक्रिय झाल्याने शिंदे हेच सामान्य शिवसैनिकाला न्याय देऊ शकतात हा विश्वास शिवसैनिकांना मिळाला.
दरम्यन, यावेळी संतोष कदम आणि प्राची कदम यांच्यासह रेहान खंडवानी, ज्योती पाटील, रेश्मा काळे, मानसी सकपाळ, प्रिया कदम, अमित खानविलकर, विजय पवार, चैतन्य पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा एक जोर का झटका दिल्याची चर्चा भायखळा विधानसभा क्षेत्रात चर्चेत आहे.
Post a Comment
0 Comments