Type Here to Get Search Results !

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही मेट्रो होणार चालू ; ही मेट्रो,ऐरोली,कोपरखैरणे,वाशी, घणसोलीपर्यंत धावणार...

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही मेट्रो होणार चालू ; ही मेट्रो,ऐरोली,कोपरखैरणे,वाशी, घणसोलीपर्यंत धावणार...

नवी मुंबई : मागील ११ वर्षांपासून रखडलेला बेलापूर ते पेंधर हा ११ किमी अंतराचा मेट्रो मार्ग अखेर गेल्या महिन्यात प्रवासी सेवेसाठी खुला झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहून सिडकोचा हुरूप वाढला असून, पूर्वनियोजित उर्वरित तीन टप्प्यांसह नवी मुंबई महापालिका क्षेत्रातसुद्धा मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्धार केला आहे.

त्यादृष्टीने प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू केल्याची माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दळणवळणाच्या अद्ययावत सुविधांवर भर दिला आहे. त्यापैकी रस्ते वाहतुकीला सर्वोत्तम पर्याय म्हणून मेट्रो सेवेचा उल्लेख केला जात आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी कार्यकाळात प्रकल्पाच्या कामाला गती देऊन हे काम, संचालनालयाची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली. महामेट्रोने या मार्ग क्रमांक १चे काम पूर्ण करून गेल्या महिन्यात त्याचे लोकार्पण केले.

तज्ज्ञांची समितीही नेमली एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोच्या मार्ग क्रमांक ८चे काम प्रगतिपथावर आहे. हा मार्ग मेट्रो मार्ग क्रमांक ८ ए अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाेडण्याकरिता सिडकोने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समितीही नेमली आहे.

मेट्रोचा विस्तार ऐरोलीपर्यंत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दक्षिण नवी मुंबईसह उत्तर नवी मुंबई क्षेत्रात मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही क्षेत्रांना जोडण्यासाठी ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि नेरूळ या नोड्सपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

Post a Comment

0 Comments