Type Here to Get Search Results !

Add

Add

जर हिंमत असेल तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पीओके ताब्यात घेऊन दाखवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना अधीर रंजन चौधरी यांनी आव्हान दिले

जर हिंमत असेल तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पीओके ताब्यात घेऊन दाखवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना अधीर रंजन चौधरी यांनी आव्हान दिले 

गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करताना पाकव्याप्त काश्मीरवरून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. त्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी, शाह आणि भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा भारतातील शूर असा उपहासात्मक उल्लेख करत आव्हान दिले आहे. मोदी आणि अमित शाहांनी पीओकेमधील किमान एक सफरचंद तरी आणून दाखवावं, जर हिंमत असेल तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पीओके ताब्यात घेऊन दाखवा, संपूर्ण देश भाजपाला मतदान करेल, असं आव्हान अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दिलं आहे.

काल गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानने काश्मीरच्या मोठ्या भूभागावर केलेल्या कब्ज्यासाठी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले होते. त्यानंतर काँग्रेसकडून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर जोरदार टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधीररंजन चौधरी म्हणाले की, पीओकेमधून किमान एक सफरचंद तर आणून दाखवा. मग सांगा की हो आम्ही करून दाखवलंय. पीओकेमधून चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होत आहे. याबाबत मोदी आणि अमित शाह का मौन बाळगून आहेत. जी-७, जी-२०, शांघाई समिटमध्ये मोदी जातात, तिथे प्रयत्न का केले जात नाही, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, पीओके पाकिस्तानच्या कब्जातून सोडवून आणून दाखवा. जे काम काँग्रेस करू शकली नाही, ते काम करून दाखवा. तिथून किमान एक सफरचंद तरी आणून दाखवा. येथे मोठमोठी बहादुरी दाखवा. लडाखमध्ये अतिक्रमण झालं आहे. गलवानची घटना सर्वांना माहीत आहे. तेव्हा पंतप्रधान काय करत होते. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, दम असेल, हिंमत असेल तर बहादुरीच्या बाता मारणाऱ्या दोन्ही बहादुरांनी जाऊन पाकिस्तानच्या कब्ज्यातून पीओके खेचून भारताच्या कब्जात आणावा. कारण ते सभागृहात बोलून गेले आहेत. १९९३ मध्य याबाबत सर्वपक्षीय ठरावरही संमत करण्यात आला होता. आता निवडणुका २०२४ मध्ये आहेत. निवडणुकांपूर्वी पीओके खेचून आणा, सर्व देशातील मतं भाजपाला मिळतील, असा टोलाही चौधरी यांनी भाजपाला लगावला.

Post a Comment

0 Comments