ELROW पब वर कारवाई नाहीच ; पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष ; ELROW पब पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच ; व्हिडीओ लागले हाथी...
पुणे :- एक डिसेंबर रोजी ELROW पबची बातमी टाईम्स ऑफ महाराष्ट्रने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काने काहीच कारवाई केली नाही, त्याच्यासोबतच पोलीस खात्याला 100 नंबर द्वारे कळविले असता, त्यांनी देखील त्याला डोळे बंद करून झोपी गेले असल्याचे निदर्शनास आले आहे.
घडला प्रकार असा की, काल दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी आमच्या प्रतिनिधींनी पोलीस कंट्रोल रूम द्वारे ELROW पब ची तक्रार केली होती. त्याच्यानंतर वीस मिनिटानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्यांनी काडी मात्र कारवाई केले नसल्याचे दिसुन आले आहे. त्याच्यानंतर आणखीन तीन वेळा कंट्रोल रूमला याबाबत कळविले असता पुन्हा पोलीस मार्शल त्या ठिकाणी आले आणि पबच्या इमारतीच्या खाली थांबून फोटो काढून तक्रार बंद (Case Close) केल्याचे पोलीस तक्रार स्टेटस ट्रेकिंग मध्ये कळाले आहे.तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला एकही फोन केलेला नाही. यामध्ये पोलिसांचे स्पष्ट डोळे झाक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे पबचे मालक यांचे किती वरिष्ठ दर्जाचे लागेबांधे आहेत यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
पुणे पोलीस यावर का कारवाई करत नाही असा प्रश्न सध्या चर्चेचा ठरला आहे.
हुक्का आणि दारूची विक्री पण पहाटे 5 पर्यंत सुरूच ; पहा व्हिडीओ...
Post a Comment
0 Comments