पुणे :- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेले गोळीबार मैदानामध्ये एस एस हँडलुम अँड हॅन्डक्राफ्ट फन फेअर एक्सिबिशन गुंटूर आंध्रप्रदेश या कंपनीच्या माध्यमातून काही दिवसांनी या मैदानामध्ये लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
परंतु यामध्ये असे कळाले की, या प्रदर्शन आयोजकांकडे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियमानुसार फायर ब्रिगेडची एनओसी नसल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. तसेच याही पलीकडे माहिती अशी मिळाली की, या ठिकाणी 50 पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार आहे. याचे ट्रेड लायसन्स, आणि अन्न परवाना देखील यांनी काढलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
भविष्यात जर जीवित हानी झाली तर जवळपास 800 ते 900 लोकांचं जीव धोक्यात घालण्याचं एस एस हँडलुम अँड हॅन्डक्राफ्ट फन फेअर एक्सिबिशन गुंटूर आंध्रप्रदेश ह्या कंपनीच्या वतीने काम सुरू आहे.
तसेच यांच्या कर्मचाऱ्यांची संपर्क साधला असता तर यांनी स्थानिक पुढार्यांना हाताशी घेऊन काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे पुढारी यांची चुकीच्या कामांमध्ये पाठराखण करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
यामध्ये प्रामुख्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे या गोळीबार मैदानावर लक्ष नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
भाग 1
क्रमशः
Post a Comment
0 Comments