Type Here to Get Search Results !

मंडई विद्यापीठ कट्टा चर्चेत पत्रकारांनी घेतला सहभाग ; पत्रकारांच्या अनेक विषयांवर झाली चर्चा...

मंडई विद्यापीठ कट्टा चर्चेत पत्रकारांनी घेतला सहभाग ; पत्रकारांच्या अनेक विषयांवर झाली चर्चा...

पुणे :- सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त होत चाललाय आणि त्यामध्ये आपल्या मित्रांना घरच्यांना व आपल्या जवळीक असलेल्या व्यक्तींना वेळ देणे त्याच्यासाठी कठीण जात आहे. त्यातच पुण्यामध्ये चर्चेचे असलेले बाळासाहेब मालुसरे अध्यक्ष मंडई विद्यापीठ कट्टा आणि पुणे शहर उप प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून दर आठवड्याला एक आगळावेगळा चर्चासत्र आयोजित केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित केले जाते. यातच यामध्ये पत्रकारांना देखील या कथेत चर्चेसाठी बाळासाहेब मालुसरे यांनी आमंत्रित केले होते. यामध्ये अनेक वृत्तपत्राचे डिजिटल मीडियाचे पत्रकारांनी सहभाग घेतला. या सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपापली प्रतिक्रिया मांडली. तसेच या कार्यक्रमात प्रामुख्याने पत्रकार हे सर्वांना प्रश्न विचारत असते परंतु या कट्ट्यात पत्रकारांनाच प्रश्न विचारण्यात आले याचे सर्व पत्रकारांना ह्या गोष्टीचा आनंद वाटला. यावेळी सर्व पत्रकारांचा शाल, सन्मानपत्र आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीचा पेन देऊन सत्कार करण्यात आले. बाळासाहेब मालुसरे यांनी मंडई विद्यापीठ कट्ट्याच्या माध्यमातून आजतागायत साडेतीनशे पेक्षा जास्त कट्टे आयोजित केले आहेत. यामध्ये प्शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, उद्योजक, व्यापारी, वृद्ध मंडळी, महिला मंडळी, युवक मंडळी, विद्यार्थी मंडळी, शिक्षक, अभियंता, सीए, डॉक्टर, राजकीय मंडळी, महापालिकेतील अधिकारी कर्मचारी अश्या अनेक मान्यवरांना यामध्ये सहभागी करून एक आगळा वेगळा चर्चासत्र त्यांनी राबवत आहेत.
मुज्जम्मील शेख - पुणे शहराध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, संपादक टाईम्स ऑफ महाराष्ट्र,
पुणे आणि पीसीएमसी प्रतिनिधी दैनिक हॅलो प्रभात(वृत्तपत्र),
राहुल हरपळे - पुणे शहर सचिव हिंदी मराठी पत्रकार संघ, संपादक न्यूज प्रहार (वृत्तपत्र)
शब्बीर मुजाहिद - संपादक हमनवा हिंदी (वृत्तपत्र),
सुरेश गुप्ता - पुणे जिल्हा संपादक दक्ष पोलीस टाइम्स (वृत्तपत्र),
नरेंद्र पारखे - संपादक पुणे सत्ता (वृत्तपत्र),
हर्षद कोठावदे - पुणे शहर प्रतिनिधी C24तास,
शिवाजी हुलावळे -संपादक छत्रपती न्यूज,
सुधीर देशमुख - संपादक वेब न्युज 24,
स्वप्निल कोठावदे - संपादक जागर न्यूज चॅनेल,
सुमित आंबेकर - संपादक मीडिया वर्ल्ड,
अमोल उदमले - प्रतिनिधी C24 तास,
नागेश देडे - संपादक न्यु स्टार न्युज इंडिया,
यांनी सहभाग घेतला.

कट्ट्यावरती झालेल्या काही महत्त्वाच्या बाबी...

डिजिटल पत्रकारांना सुध्दा आरोग्य विमा व इतर सुविधा मिळायला हव्या :- मुज्जम्मील शेख, पुणे शहराध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, संपादक - टाईम्स ऑफ महाराष्ट्र

डिजिटल मिडिया पत्रकारांना सुध्दा पुणे पत्रकार संघाचे सभासद करून घ्यायला हवे - हर्षद कोठावदे - पुणे शहर प्रतिनिधी C24 तास

कट्ट्यावर व्यक्त होणं आमच्या सारख्या पत्रकारांसाठी आनंदाची पर्वणीचं ठरली :-सुधीर देशमुखसंपादक वेब न्यूज 24

आम्ही पत्रकार म्हणून समाजातील प्रत्येक विषयाचे प्रश्न विचारत असतो, मांडत असतो परंतु आज मंडई कट्ट्याच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दयावी लागली आणि हयातूंनच संवाद परिसंवादातून मनमोकळ्या चर्चेला वाचा फुटली हा अनुभव आमच्या सारख्या पत्रकारांना सुखावून गेला : कट्ट्यावरील सर्व पत्रकार बांधव

ह्या वेळी कार्याध्यक्ष हर्षद बाळासाहेब मालुसरे, खिसाल जाफरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments