Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून संदीप शिवरकर यांची निवड...!!!

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून संदीप शिवरकर यांची निवड...!!!

पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील संदीप रमेश शिवरकर यांची निवड करण्यात आली.

संदीप शिवरकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहेत. या पदावर असताना नागरिकांच्या समस्या व्यवस्थित मार्गी लावल्या. शिवरकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. या परिषदेत शहर पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलीस, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, आरोग्य विभाग, दूरसंचार विभाग, वीज वितरण कंपनी, व्यापार व उद्योग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासह शासकीय विभागांबरोबरच् ग्राहक संघटना यांचे अशासकीय प्रतिनिधी सदस्य असतात.

संदीप शिवरकर म्हणाले की, माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊन नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी काम करणार आहे.

Post a Comment

0 Comments