Type Here to Get Search Results !

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे प्रख्यात ऑडिओ कथाकार आणि लेखक नीलेश मिस्रा यांच्या कथाकथनाच्या मास्टरक्लास सत्राचे आयोजन...

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, पुणे येथे प्रख्यात ऑडिओ कथाकार आणि लेखक नीलेश मिस्रा यांच्या कथाकथनाच्या मास्टरक्लास सत्राचे आयोजन...

पुणे,२२ डिसेंबर : भारतातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय के१२ शालेय शृंखलेतील एक असलेल्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने पत्रकार, ऑडिओ कथाकार आणि लेखक नीलेश मिश्रा यांच्यासोबत एक विशेष मास्टरक्लास आयोजित केला, ज्याचा उद्देश तरुण मनांना स्वाभाविकतेपलीकडे विचार करण्याच्या क्षमतेने सुसज्ज करणे होते. 
परस्परसंवादी सत्रात, नीलेश मिस्रा यांनी एक पत्रकार आणि लेखक म्हणून त्यांच्या अनुभवाचे भांडार विद्यार्थ्यांसमोर उघडत, कथाकथनाच्या बारकाव्यांबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. त्यांनी संवादातील कथाकथनाच्या महत्त्वावर भर दिला आणि विद्यार्थ्यांना त्यांचे विचार परिणामकारकपणे व्यक्त करण्यासाठी कथनाच्या सामर्थ्याचा वापर करण्यास प्रोत्साहित केले.

या मास्टरक्लास सत्रात सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले, जे आज पुण्यातील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या मंजरी कॅम्पसमध्ये आयोजित झाले होते. ही मास्टरक्लास मालिका ‘पॉवर अप विथ लेजंड्स’ उपक्रमाचा एक विस्तार आहे, ज्यात क्रीडा, कला आणि संगीत क्षेत्रातील बायचुंग भुतिया, मेरी कोम, शिखर धवनची दा वन स्पोर्ट्स अकादमी, गीता फोगाट, अजंथा मेंडिस, शिव आरूर आणि तनुश्री सिंग यांनी विद्यार्थ्यांसोबत भारतातील विविध कॅम्पसमध्ये गेल्या सहा महिन्यांत मास्टरक्लास आयोजित केले आहेत.

याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना निलेश मिस्रा म्हणाले, “कथाकथन मुलांमध्ये कल्पनेचा शब्दसंग्रह निर्माण करण्यात मदत करते, कारण कथांमध्ये कल्पकता प्रज्वलित करण्याची, मूल्ये रुजवण्याची आणि जगाची सखोल समज जोपासण्याची शक्ती असते. हे एक रॉकेट इंधन आहे, जे भारताच्या विद्यार्थ्यांना उड्डाणात मदत करेल. विविधतापूर्ण शिक्षणाचा अनुभव पुरवण्याची, खास करून पब्लिक स्पिकिंग अतिशय कौतुकास्पद आहे, आणि त्याच्या मास्टरक्लास उपक्रमाचा भाग होण्याचा मला सन्मान वाटतो.” 
शिक्षणात कथाकथनाच्या महत्त्वाबाबत बोलताना, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, पुणेच्या व्हीपी-अॅकॅडमिक्स, सुमित्रा गोस्वामी म्हणाल्या, “नीलेश मिस्रा यांच्या मास्टरक्लास दरम्यान विद्यार्थ्यांनी दाखविलेली एकाग्रता आणि उत्साह, भविष्यातील पिढ्यांना आकार देण्यात ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देते. ही मास्टरक्लास मालिका आमच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या परिवर्तनीय शक्तीची केवळ झलक आहे आणि ती आमच्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांसाठीच नव्हे, तर जीवनाच्या असीमित शक्यतांसाठी तयार करणारी आहे.”

Post a Comment

0 Comments