Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे जिल्ह्यात आढळले कोरानाच्या नवीन व्हेरीअंटचे 3 रुग्ण ; राज्यात भीतीचे वातावरण...

पुणे जिल्ह्यात आढळले कोरानाच्या नवीन व्हेरीअंटचे 3 रुग्ण ; राज्यात भीतीचे वातावरण...


कोरानाचा नवीन व्हेरीअंट जेएन 1 चे पुणे महानगरपालिका हद्दीत 2, पुणे जिल्हा हद्दीत 1 असे 3 रुग्ण अढळले आहेत. राज्यात जेएन 1 चे रुग्णसंख्या 9 वर पोहचली आहे.

पुणे :- करोना विषाणूचा नवीन उप प्रकार जेएन 1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन 1 च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत 5, पुणे महानगरपालिका हद्दीत 2, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी 1 रुग्णाची एकूण 9 रुग्णांची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

देशात जेएन.1 या उपप्रकाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर या उपप्रकाराचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्ण हा 41 वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.1 चे आणखी 9  रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 5 रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत.

या रुग्णांमध्ये 8 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यात 9 वर्षांचा एक मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षांचा पुरूष आणि इतर रुग्ण 40 वर्षांवरील आहेत. केवळ पुण्यात आढळेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून, तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments