Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

'पीएमपीएमएल' बस ठरली तरुणाचा काळ ; बस धडाक्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू देहू रस्त्यावरील घटना...

'पीएमपीएमएल' बस ठरली तरुणाचा काळ ; बस धडाक्यात तरुणाचा ; दुर्दैवी मृत्यू  देहू रस्त्यावरील घटना...

पिंपरी : पीएमपीएमएल बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मोशी येथे देहू रस्त्यावर मंगळवारी (दि. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला.

उस्मान मुस्ताक अली खान (२१) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी निजाम जन्नन खान (३५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बसचालक नामदेव मंचकराव केंद्रे (२८, रा. आळंदी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मान मुस्ताक अली खान हा निजाम खान यांच्या दुकानात काम करत होता. तो मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोशी येथील देहू रस्ता येथून दुचाकीवरून कुदळवाडीकडे जात होता. त्यावेळी चालक नामदेव केंद्रे याने त्याच्या ताब्यातील पीएमपीएमएल बस निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार उस्मानचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव आंगज तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments