पुणे :- सध्या शहरात सर्वत्र लग्नाचा धूमधडाका सुरू झाला आहे. लग्न समारंभांना मोठ्या प्रमाणात गर्दीही होत आहे. मात्र, सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी हॉल वाल्यांकडे पार्किंगची जागा नसल्याने त्यांच्या गाडी रस्त्यावरच सर्रास वाहने पार्क केली जात आहेत.
त्यामुळे कोंढव्यात आणि गंगाधाम कोंढवा रोड दरम्यान दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
कोंढवा आणि त्याच्या जवळपासच्या परिसरात अनेक लग्न कार्यालये आहेत. सध्या लग्नसराई सुरु आहे. दिवसभराचे काम उरकून पाहुण्यांना विवाहाला उपस्थित राहता यावे, या उद्देशाने वधू-वर पिता मुहूर्ताची वेळ संध्याकाळची ठेवतात. पुणे उपनगरातील आणि हवेली तालुक्यातील पुढाऱ्यांना एकाचवेळी अनेक लग्नांची निमंत्रणे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी भेटी देत जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरातील लग्नाच्या वेळी ते उपस्थित राहतात.
रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांच्या भेटी सुरू असतात. लग्न समारंभासाठी नेतेमंडळी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसते. कारण, येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यादृष्टीने माजी नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्था मधील इच्छुक उमेदवार, आमदार, खासदार व इतर यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते.
दरम्यान, लग्न समारंभ लवकर उरकून ताबडतोब पुढील कामासाठी आलेले पाहुणे त्यांची गाडी रस्त्यालगत लावतात. त्यामुळे कोंढव्यात सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अनेकवेळा तर तासभरही कोंडी सुटत नाही. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण होते.
लग्न समारंभासाठी आलेले स्थानिक नागरिक, पुढारी अथवा त्यांचे नातेवाईक त्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने गाड्या रस्त्यावरच लावतात. परिणामी यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो. याकडे कोंढवा आणि सहकार नगर वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
लग्न समारंभामुळे कोंढवा भगत वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच कोंढव्यात असलेले सर्व लग्न कार्यालय मालकांना बोलविणार आहे. आणि त्यांना सूचना देणार आहे त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या तर कडक कारवाई करणार आहे. कारवाई येथून पुढे सतत चालू राहणार आहे.
सोमनाथ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कोंढवा वाहतूक शाखा
कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, बिबवेवाडी, कात्रज इतर उपनगरातील युवक, युवती आणि इतर नागरिक पुण्यात नोकरी करत असल्याने दररोज पुणे - कोंढवा - उंद्री - खडीमशिन चौक - कात्रज तेथून पुढे सातारा महामार्गावरून जावे लागते. कामावर जाताना व येताना यामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन दिवस उशिरा ऑफिसमध्ये पोहचते. परिणामी, कामाचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांनी यातून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी माझी विनंती आहे.
– नागरिक, कोंढवा
सिटी लॉन्स, पारगे नगर
वेलकम हॉल, कोंढवा
कौसर बाग क्लब ग्राउंड, कोंढवा
बाबर हॉल, कोंढवा
क्रिस्प अँड करी, कोंढवा
बिस्मिल्ला हॉल, कोंढवा
श्रीजी लॉन्स, कोंढवा गंगाधान रोड
राजयोग लॉन्स, कोंढवा गंगाधान रोड
ओमकार गार्डन पारगेनगर,
गोयल गार्डन, कोंढवा गंगाधान रोड
वर्धमान लॉन्स, कोंढवा गंगाधान रोड
लग्न कार्यालयांकडे अनेक परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे आले निदर्शनास...
या लग्नकार्यालया बाबत फायर ब्रिगेड तसेच महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्याशी या कार्यालयाबद्दल माहिती विचारले असल्यास त्यांनी सांगितले की आमच्याकडून कोंढव्यातील कोणत्याच हॉल धारकाकडे ना हरकत प्रमाणपत्र आणि परवानगी देण्यात आलेल्या नाहीत.
यामध्ये प्रामुख्याने फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, कोणत्याच हॉल धारकाकडे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यामध्ये जर भविष्यात जीवित हानी झाली, तर हॉलमधील नागरिकांच्या जीवाचं काय असा मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत लग्न कार्यालय ठेवतायेत सुरू...
टाईम्स ऑफ महाराष्ट्र ने काही दिवसांपूर्वीच कौसर बाग सोसायटी लागत असलेल्या कौसर बाग क्लब ग्राउंड हे अनियमित वेळेत सुरू ठेवत असल्याचे त्यामध्ये दाखवण्यात आले होते. त्यावर पोलिसांनी कोणतीच कारवाई केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या हॉल धारकांना कोंढवा पोलीस कानडोळ करत असेल तर भविष्यात याचा मोठा फटका बसेल याला नाकारता येत नाही.
Post a Comment
0 Comments