Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

कोंढव्यातील शासकीय जागेत अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिका विरोधात आझाद समाज पार्टीने दिले पुणे मनपाच्या आयुक्तांना निवेदन...

कोंढव्यातील शासकीय जागेत अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिका विरोधात आझाद समाज पार्टीने दिले पुणे मनपाच्या आयुक्तांना निवेदन...

पुणे :- शहरात हल्ली अवैध बांधकाम व तसेच अतिक्रमण हे याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याचे दिसत आहे. त्यातच कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर मध्ये असलेले सत्यम कशिश अपार्टमेंट या इमारतीच्या बिल्डरने अक्षरशः ओढ्याची जागा बळकवल्याचे घटना घडली आहे. याच्या तक्रारी करिता आझाद समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष निखिल भिंगारदिवे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे.

आझाद समाज पार्टी पुण्यात अवैद्य बांधकाम आणि अतिक्रमण केलेल्या बांधकाम व्यवसायिकांवर पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे निखिल भिंगारदिवे यांनी सांगितले आहे.
तसेच त्यांनी निवेदनात सांगितले आहे की, या ओढ्याचा वापर नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याची पावसाळ्यात अतिवृष्टी मध्ये खूप गरज आहे. तसेच लवकरात लवकर अतिक्रमण हटवून संबंधित बिल्डर वर कारवाई न झाल्यास या परिसरातील व रहिवाशांना घेऊन आजाद समाज पक्ष पुणे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments