Type Here to Get Search Results !

पुण्यात अनियमित वेळेपर्यंत लग्नाचे हॉल सुरू असल्याने होतायेत वाद ; कोंढव्यात हॉल चालक आणि आयोजकांमध्ये झाले वाद; भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता...

पुण्यात अनियमित वेळेपर्यंत लग्नाचे हॉल सुरू असल्याने होतायेत वाद ; भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता...

पुणे :- हल्ली लग्नाचे मुहूर्त सुरू असल्याने पुणे शहरात अनियमित वेळेत लग्न समारंभाचे हॉल सुरू असल्याने वाद होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर पुणे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

लग्न समारंभाचे हॉल मध्ये असलेले वधू-वरांकडील नातेवाईक हे अनियमित वेळेत आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते त्यामुळे त्यांचा कार्यक्रम लांबत जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 
लग्न कार्याचा हॉल धारकाने 11 वाजेपर्यंत ची वेळ ठरवून दिलेली असते आणि पोलीस प्रशासनाने देखील अकरा वाजेपर्यंतची उभा नागरिकांना दिली आहे परंतु हे कार्यक्रम रात्री 12, 1 आणि 2 वाजेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
आम्हाला आमच्या काही बातमीदारांकडून कोंढव्यातील कौसरबाग हॉल यामध्ये असाच एक प्रकार अनियमित वेळेत सुरू असल्याने सोसायटी आणि अयोजनकांमध्ये वाद झाल्याचे प्रकार आमच्या हाती लागले आहे.
यामध्ये हॉलच्या शेजारी असलेले कौसरबाग सोसायटीतील रहिवाशी यांना या लग्नकार्याचा देखील मोठा त्रास भोगावा लागत असल्याने हे वाद झाल्याचे कळाले आहे.

हॉल धारकांवर आणि आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज...
सदर हॉल धारकांवर कारवाई केली तर तसेच दंड आकारला तर हे नियमित वेळेत बंद होतील.
पाणी वधू आणि वर यांच्याकडील पालकांना देखील हा दंड ठोठावला गेला पाहिजे जेणेकरून हे लग्न समारंभ वेळेत पूर्ण होईल आणि कोणतीही दुर्घटना आणि हानी पोहोचणार नाही अशी परिस्थिती राहील.

उशिरापर्यंत चालत असल्याने अनेकांचे कामाचे तारांबळ...
हे लग्नाचे कार्यक्रम मध्ये असलेले अनेक लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. या मध्ये केटरर्स, फोटोग्राफर, बँड वाले, डेकोरेशन, वेटर्स, लेडीस वेटर्स व इतर असे अनेकांची तारांबळ होत असल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment

0 Comments