Type Here to Get Search Results !

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; पुण्यात तब्बल १० नामांकित पब आणि रेस्टॉरंटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई...

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; पुण्यात तब्बल १० नामांकित पब आणि रेस्टॉरंटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई...


पुणे :- टाईम्स ऑफ महाराष्ट्राने काही दिवसांपूर्वी अनेक पब आणि रेस्टॉरंटच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, तसेच पुणे शहर पोलीसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला तक्रारी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काने संबंधित पब धारकांवर कारवाई केली आहे.

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच युवक आणि युवती मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा गोष्टींना रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. 
अनियमित वेळेत नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड लावल्याप्रकरणी पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अनेक बातम्या आणि व्हिडीओ न्युजच्या माध्यमातून टाईम्स ऑफ महाराष्ट्रने प्रसिद्ध केल्या होत्या या कारणावरून पुणे शहराच्या अनके भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित पब आणि हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज असल्याचे अधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

कोण कोणत्या पब आणि हॉटेल्सवर  झाली कारवाई?

    प्लंज, कोरेगाव पार्क

    लोकल गेस्ट्रो बार

    युनिकॉर्न पब 

    आर्यन बार, बालेवाडी

    नारंग वेंचर

    हॉटेल मेट्रो

    बॉलर, कल्याणी नगर

    लेमन ग्रास, विमाननगर

    एलरो

    हॉटेल काकाज


कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, हिंजेवाडी, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. तरूणाईला आकर्षित करण्यासाठी पबमध्ये अनेक सवलती दिल्या जात असल्याने युवक त्या ठिकाणी आकर्षित होत आहे. 

Post a Comment

0 Comments