Type Here to Get Search Results !

शेतकरी संघाच्या ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

शेतकरी संघाच्या ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल...

चंदगड : येणे बाकी नसताना शाखा ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शेतकरी सहकारी संघाच्या मजरे कार्वे शाखेच्या व्यवस्थापकाविरोधात चंदगड पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी त्याप्रकरणी शाखेचा पंचनामा करून दप्तर ताब्यात घेतले आहे.
शंकर रामू इंगवले (रा. अडकूर, ता. चंदगड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. इंगवले यांनी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यानच्या काळात येणे बाकी नसताना ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपये येणे असल्याचे दाखवल्याचा ठपका ठेवत फिर्यादी चार्टर्ड अकाउंटंट अशोक उमराणी यांच्या तक्रारीवरून चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार सोमवारी उमराणी, पोलिस उपनिरीक्षक शेखर बारामती, पोलिस पाटील माधुरी कांबळे, सखाराम दळवी यांनी कसून चौकशी करत शाखेचा पंचनामा केला. त्यानुसार शाखेचे दप्तर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नेमका किती अपहार झाला, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments