इंदोरमध्ये भाजपाला लाभले यश ; यशामुळे विश्वजीत राणेंचे महत्त्व वाढले...
इंदोर : मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक निकालावेळी इंदूर परिसरातील व भाजपचे सर्व नऊ उमेदवार निवडून आल्याने भाजपच्या केंद्रीय वर्तुळात मंत्री विश्वजीत राणे यांचे राजकीय महत्त्व व वजन वाढले आहे.
३० वर्षांनंतर प्रथमच इंदूरमध्ये भाजपचे नऊ उमेदवार निवडून आले. विश्वजीत राणे हे ४४ दिवस - इंदूरमध्ये तळ ठोकून होते. निवडणूक - प्रचारावेळी विश्वजीत यांच्याकडे भाजप प्रभारी म्हणून सहा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या शिवाय अन्य तीन मतदारसंघांमध्ये ते उमेदवारांना सहकार्य करत होते. उमेदवारांमध्ये व पक्षीय यंत्रणेच्या कामात समन्वय ठेवत होते. सर्व उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून विश्वजीत यांनी काही सभांवेळीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
आपल्याकडे सोपवलेल्या सहापैकी पाच मतदारसंघांत तरी निश्चितच भाजप जिंकेल, असे विश्वजीत यांनी केंद्रीय नेत्यांना सांगितले होते. तथापि, सर्व सहा उमेदवार जिंकले. शिवाय बाजूच्याही तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार जिंकल्याने हा चर्चेचा विषय बनला. अर्थात भाजपने दिलेले प्रत्येक उमेदवार हे प्रबळ होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राणे यांनाही श्रेय दिले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मेसेजद्वारे राणे यांचे अभिनंदन केले. कैलाश विजयवर्गीय, रमेश मेंदोला, गोलू शुक्ला, मालिनी गौड, महेंद्र हाडीया, मधू वर्मा, मनोज पटेल, उषा ठाकुर, लुससी सिलावट हे उमेदवार जिंकले आहेत.
Post a Comment
0 Comments