'बिग बॉस १७ : सलमान खान दाखवणार अंकिता लोखंडे आणि विकी जैनला बाहेरचा रस्ता? कारण समोर आलं...
'बिग बॉस' हिंदीच्या नव्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. 'बिग बॉस १७' मध्ये मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली होती. पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत.
'पवित्रा रिश्ता'मधून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात येताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तर विकी या शोचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जाऊ लागला. पहिल्या दिवसापासूनच विकी 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी प्लॅनिंग करताना दिसून आला. त्याने 'बिग बॉस'च्या फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी मास्टर प्लॅन केल्याचा खुलासाही नुकत्याच झालेल्या भागात बिग बॉसने नील भट्टशी बोलताना केला. विकीचा हा मास्टर प्लॅनच त्याच्यावर आता भारी पडणार आहे. यामुळे विकीबरोबर अंकितालाही 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घ्यावी लागू शकते.
'बिग बॉस'च्या वीकेंड का वॉरचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान "बिग बॉसच्या घरात येण्याआधी कोणी कोणाबरोबर संपर्क केला," असं विचारतो. यावर विकी "दोन दिवस आधी माझं आणि नीलचं बोलणं झालं होतं", असं म्हणतो. यानंतर सलमान अंकिताला याबद्दल माहीत होतं का? असं विचारतो. त्यावर ती "मला नंतर माहीत पडलं" असं म्हणते. त्यावर सलमान सना खानला "याचा अर्थ काय होतो?" असं विचारतो. "व्हायकॉमकडे त्यांना शोमधून काढून टाकण्याचे हक्क आहेत," असं सना म्हणते. त्यामुळे बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अंकिता आणि विकीला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Post a Comment
0 Comments