Type Here to Get Search Results !

पुण्यातील सोन्याच्या दुकानातील घटना ; एक कोटीचे दागिने घेऊन कर्मचारी फरार...

पुण्यातील 
सोन्याच्या दुकानातील घटना ; एक कोटीचे दागिने घेऊन कर्मचारी फरार...

पुणे : पुण्यातील सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एक कोटी १५ लाखांचे दागिने इतर व्यावसायिकांना विक्री न करता दागिने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना बुधवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजता रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानात उघडकीस आली आहे.

याबाबत जितेंद्र धनराज सोनिग्रा (वय-४५ रा. मॅरिगोल्ड बिल्डींग, सॅलसबरी पार्क, मार्केटयार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादी यांच्या दुकानातील सेल्समन विक्रम अमृतलाल बाफना (रा. भिक्षु सदन, प्रेमकुमार शर्मा रोड, माधव बाग जवळ, गिरगाव, मुंबई) याच्याविरुद्ध आयापीसी ४०८,४२०  नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सोनिग्रा यांचे रविवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. या ठिकाणी आरोपी विक्रम बाफना हा सेल्समन म्हणून कामाला आहे. फिर्यादी यांनी आरोपी बाफना याच्याकडे एक कोटी १५ लाख ४२ हजार  रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने शहरातील व्यापाऱ्यांकडे विक्री करण्यासाठी दिले होते. मात्र आरोपीने सोन्याची विक्री न करता ते सोने घेऊन पळून गेला. फिर्य़ादी यांनी आरोपीला १९९० ग्रॅम १०० मिलीग्रॅम वजनाचे २२ कॅरेट च्या २४५ सोन्याच्या चैन विक्रीसाठी दिल्या होत्या. विक्रम बाफना याने सोन्याची विक्री न करता जितेंद्र सोनिग्रा यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.Post a Comment

0 Comments