Type Here to Get Search Results !

पुणे विद्यापीठात मोदींनविरोध आक्षेपार्ह लिखाण; भाजपा कार्यकर्त्यांचे आंदोलन; दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनसामने...

पुणे विद्यापीठात मोदींनविरोध आक्षेपार्ह लिखाण; भाजपा कार्यकर्त्यांचे आंदोलन; दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनसामने...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भितींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत लिहल्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजयुमोचे आणि एसएफआयचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळातच भाजपने त्यांचे आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

पुणे विद्यापीठात अशा गोष्टी होणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. काही गुंड प्रवृत्तीचे लोक विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. विद्यापीठातील मध्यवर्ती भागातील रीफेक्ट्रीजवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला होता. या घटनेत दाेन्ही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते जखमी झाले होते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पाेलीस १३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेतर्फे रिफेक्ट्रीजवळ सभासद नोंदणी सुरू होती. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. सभासद नाेंदणीवरून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. या घटनेची माहिती समजताच सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यस्थी करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहाणीच्या प्रकारात दाेन्ही संघटनांचे विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, काही वर्षांपूर्वी अभाविप आणि एसएफआय विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाेरदार हाणामारीचा प्रकार घडला हाेता.

Post a Comment

0 Comments