Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये सहा जण अडकले ; अग्निशमन दलाकडून त्यांची सुखरूप सुटका...

ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये सहा जण अडकले ; अग्निशमन दलाकडून त्यांची सुखरूप सुटका...

पुणे : ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये पाच ते सहा जण अडकल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाकडून लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याचे दलाकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ११ वाजून ५० मिनिटे यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे लिफ्ट अडकली असून आतमध्ये काही नागरिक अडकल्याची वर्दि मिळाली होती. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. घटनास्थळी पोहोचताच ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट सुमारे तासभर अडकली होती. त्यावेळी आतमध्ये सहा जण असल्याची जवानांकडून खाञी करण्यात आली.

जवानांनी लिफ्टमध्ये असणाऱ्या लोकांना "घाबरू नका; आम्ही आहोत" असे म्हणत धीर दिला. काही जवानांनी अकरा मजली असलेल्या इमारतीच्या गच्चीवर जात लिफ्ट रुममधून सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्याचवेळी खाली लिफ्ट अडकलेल्या ठिकाणी लोकांची भेदरलेली परिस्थिती व गुदमरलेली स्थिती पाहत तातडीने एका फॅनची व्यवस्था करुन हवेचा स्तोञ सुरू केला. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लिफ्टचा दरवाजा वाकवत व ओमेगा कंपनी लिफ्टच्या कर्मचाऱ्यांसमवेत सातव्या मजल्यावर जाऊन लिफ्ट चालू बंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णालयाचे चार कर्मचारी (तीन पुरुष एक महिला) व दोन नागरिक (पुरुष) अशा एकुण सहा जणांची साडेबारा वाजता सुखरूप सुटका करण्यात आली.

Post a Comment

0 Comments