Type Here to Get Search Results !

कोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ; पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कधी होणार जागे ?

कोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ; पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कधी होणार जागे ?

पुणे :- शहरात वाहतुकीचे मोठे प्रश्न असताना, कोंढव्यातील कोणार्क इंद्रायू मॉलच्या समोरून मिठानगर कडे जाणारा रस्ता येथे अतिक्रमण केलेल्यांमुळे त्या रस्त्यावर येजा करण्याऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. मिठानगर ते नावजीश पार्क ते अम्मार रेसिडेन्सी साईबाबा नगर पर्यंत रस्ता अगदी छोटा आहे.
त्यामध्ये फळ व्यवसायिक, चिकन शोरमा धारक, व्यवसायिक दुकानदारांच्या चुकीच्या लागलेल्या गाड्या, विना परवाना रिक्षा स्टँड, नवीन अवैध इमारतीच्या काम सुरू असलेले वाहने, चिकन दुकानदारांचे माल वाहतूक करणारी गाडी, तसेच चिकन व्यवसाय करणाऱ्या दुकानासाठी कचऱ्याची गाडी अश्या अनेक गोष्टीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्या रस्त्यावर रुग्णवाहिका (Ambulance) अडकल्याचे प्रकार झाले आहे. तसेच अग्निशमन दलाची गाडी (Firebrigade) देखील अनेकदा या वाहतुकीत अडकली असल्याची माहिती त्या ठिकाणी राहत असलेले नागरिकांनी दिली आहे. 
रविवारी भरणारे बाजारामुळे मुख्य रस्त्यावर गर्दीच गर्दी...
कोंढाव्यात रविवारी भरणारे संडे बाजारामुळे कोंढाव्यातील सत्यानंद हॉस्पिटल समोर मुख्य रस्त्यावर गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे त्या रस्त्यावर भयंकर प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दर रविवारी पाहायला मिळत आहे.

महापालिका अतिक्रमण अधिकारी झोपेत...
महापालिकेतील अधिकाऱ्यांना या अवैध अतिक्रमण केलेल्यांवर कारवाईसाठी सांगितलेले असता अतिक्रमण अधिकारी निरीक्षक हे त्या ठिकाणी कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नक्की हे अतिक्रमण अधिकारी कोंढव्यातील कोणाला घाबरत आहेत की, कोणाचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे असा मोठा प्रश्न उद्भवला आहे. 
वाहतूक शाखेतील पोलिसांनाच राजकीय कार्यकर्त्यांकडून दमदाटी ?
कोंढव्यातील वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचारी जर अतिक्रमण केलेल्यांना व्यवस्थित वाहने लावण्यास सूचना दिले असता पोलिसांना राजकीय पुढाऱ्यांना घेऊन दमदाटी आणि दबाव आणण्याचा प्रकार घडत आहेत. 

ह्यावर आता नेमका प्रश्न असला पडला आहे की ? सदरील अतिक्रमण केलेल्यांवर महापालिका कधीपर्यंत कारवाई करतील यावर चर्चेचा विषय बनला आहे

Post a Comment

0 Comments