Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला अटक ; कोंढवा पोलिसांची कारवाई...

पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला अटक ; कोंढवा पोलिसांची कारवाई...

कोंढवा (पुणे) : पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तुळशीराम शहाजी उगडे (वय २५, रा. टिळेकरनगर, पुणे, मूळ रा. लांडवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

आरोपीकडून दोन पिस्टल, चार जिवंत काडतुसे असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

येवलेवाडी खडी मशिन चौकाजवळील श्रीराम चौक ते इस्कॉन मंदिर संशयित आरोपी थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आली.

आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील करीत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, हवालदार विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, लवेश शिंदे, जोतिबा पवार, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

Post a Comment

0 Comments