'अजितदादां'च्या काटेवाडी गावच्या निकालने केले सर्वांचा लक्ष केंद्रित ; शरदपवारांचा गट निवडणुकीपासून लांब...
बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील ३२ पैकी ३१ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी (दि. ६) सकाळपासून सुरु आहे. यामध्ये बहुतांश काटेवाडी, पारवडी वगळता ग्रामपंचायतीच्या निवडणुका अजित पवार गटाअंतर्गत लढल्या गेल्या.
रविवारी बारामती तालुक्यात दुपारी ११.३० पर्यंत ३५.७३ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५५.९८ टक्के, ३.३० वाजेपर्यंत ७२.४९ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसिल कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. बारामती तालुक्यात काटेवाडी, पारवडी वगळता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी अजित पवार गटाचे दोन्ही गट आमनेसामने उभा आहेत. राष्ट्रवादीचा शरद पवार गट या निवडणुकीत अपेक्षित सक्रिय नसल्याचे चित्र आहे. शरद पवार गटाची बारामती तालुक्यात दयनिय अवस्था असल्याचे सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीवरुन दिसून येते.
यंदा ऐन दिवाळीत बारामतीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळाली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावाच्या निकालाची सर्वाना उत्सुकता आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावच्या निकालाची देखील सर्वांना उत्सुकता आहे.
तालुक्यातील काटेवाडी सह, गुनवडी, डोर्लेवाडी, काळखैरेवाडी, पानसरेवाडी, चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, दंडवाडी, सुपा, सायबाचीवाडी, वंजारवाडी, गाडीखेल, साबळेवाडी, शिर्सुेफळ, मानाप्पावस्ती, मसोबानगर कोराळे खुर्द, आंबी बुद्रुक, पवईमाळ, धुमाळवाडी, मेडद, करावागज, करंजेपूल, करंजे, चौधरवाडी, मगरवाडी, पारवडी, जराडवाडी, उंडवडी कप, मुढाळे व निंबोडी या ग्रामपंचायतीचे निकाल थोड्याच वेळात समजणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढल्याचे चित्र होते.
Post a Comment
0 Comments