कोंढवा पोलीसांची मोठी कारवाई ; 25 लाखांचा गुटख्याचा साठा केला जप्त ; प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची व्यावसायिकांना मिळत आहे साथ ? कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा व्यवसाय ?
पुणे :- राज्यात गुटका विक्रीस बंदी असून सुद्धा गुटख्याचा मोठा साठा कोंढवा पोलीसांनी पकडला आहे. या कारवाईत दोन जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली आहे.
कोंढवा पोलीसांनी पिकअप वाहनासह 24 लाख 87 हजार 771 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.18) येवलेवाडी येथील पानसरेनगर मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये व टेम्पोमध्ये केली.
दिनेश रज्जूराम मालू (वय- 23 रा. पानसरेनगर, येवलेवाडी, पुणे) याला अटक केली आहे. तर प्रकाश प्रेमाराम भाटी (रा. कोंढवा, पुणे)
यांच्यावर भादवी 328, 272, 273, 34 सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनिमय अधिनियम कलम ७(२०),२०(२) व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 200६चे कलम 26( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी एलआयबी पथकाचे पोलीस हवालदार अमोल नवनाथ फडतरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीसांना माहिती मिळाली की, पानसरे नगर गल्ली नं. 10 येथे एक पिकअप (एमएच 12 यु एम 1386) टेम्पो उभारला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेल्या गुटख्याची पोती आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री करुन कोंढवा पोलीसांनी छापा टाकून चालक दिनेश मालू याला ताब्यात घेतले.
त्याच्या गाडीतून आणि जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमधून 24 लाख 87 हजार 771 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची साथ मिळत असल्याचे सूत्रांकडून माहिती ?
प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे गुटका व्यावसायिकांना साथ देत असल्याची माहिती मिळाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने कोथरूड मधील एका मोट्ट्या गुटक्याच्या व्यवसायिकाला प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मदत करत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
Post a Comment
0 Comments