Type Here to Get Search Results !

पुण्यात मनोज जरांगे यांची सभा असताना ऑन ड्युटी ट्राफिक पोलिसांनी काढल्या झोपा ; नागरिकांनी केली निलंबनाची मागणी...

पुण्यात मनोज जरांगे यांची सभा असताना ऑन ड्युटी ट्राफिक पोलिसांनी काढल्या झोपा...

पुणे :- पुण्यात 20 नोव्हेंबरला अनेक बंदोबस्त असताना ट्राफिक पोलिसांनी अक्षरशः कार्यरत असल्याच्या ठिकाणीच झोपा काढल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. पुण्यातील वानवडी ट्राफिक डिव्हिजन मधील कर्मचारी गणेश येळे हे ऑन ड्युटी कार्यरत असताना, ते झोपा काढत असल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. ते रामटेकडी या ठिकाणी ड्युटीवर होते. 20 नोव्हेंबरला सकाळी 11:45 च्या वाजल्याच्या सुमारास चौकात गर्दी असताना वानवडी ट्राफिक डिव्हिजन मधील कर्मचारी गणेश येळे हे मस्त पैकी "नो फिकर नो टेन्शन" म्हणत झोपा काढत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांची भीती नसल्याचे दिसून येत आहे. यावर काही नागरिकांनी अश्या बेजाबदार कर्मचाऱ्यांची निलंबन होण्याचे गरज असल्याचे सांगितले आहे.
                         पहा व्हिडीओ 
                          पहा व्हिडीओ 
पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी अनेक कार्यक्रमांचा अनेक प्रमुख व्यक्तींचा वावर होता. त्यामध्ये मराठा समाजाचा मनोज जरांगे यांचा कार्यक्रम तसेच बागेश्वर धाम महाराजांचा सत्संग असे दोन मोठे कार्यक्रम देखील पुण्यात या दिवशी होते. काही दिवस अक्षरशः ट्राफिक पोलिसांची साप्ताहिक सुट्टी सुद्धा बंद करण्यात असल्याचे समजले आहे. पुणे पोलिसांचं नाव कुठेच खराब होऊ नये याचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्यामध्ये जर कर्मचारी असे वागत असतील तर कसे चालणार. वानवडी ट्राफिक डिव्हिजन मधील गणेश येळे यांच्या बद्दल माहिती घेतली असता, हे ड्युटीवर अनेकदा असेच करत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे. तसेच ज्या ज्या चौकात हे कार्यरत असतात त्या ठिकाणी फक्त गाड्या अडवून पैसे घेणे आणि त्यांना सोडून देणे. आणि गर्दी असताना झोप काढणे असा प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी त्यांच्याबद्दल सांगितले आहे.
यावर आता पोलीस आयुक्त आणि ट्राफिक पोलीस उपायुक्त काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments