गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने, आठ जण गंभीर जखमी मुंबई वांद्रेतील घटना...
मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी घडली. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वांद्रे येथील गझबंद रोडवरील फिटर गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीची ही घटना घडली. दरम्यान, तिथे असलेले कपडे इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टोलेशन यामुळे आग पसरली. आगीची माहिती मिळताच दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे
निखिल दास (वय ५३), राकेश शर्मा (वय ३८), अँथोनी थेंगल (वय ६५), कालीचरण कनोजिया (वय ५४), शाह अली सिद्दिकी (वय ३१), समशेर (वय ५०), संगीता (वय ३२), सीता (वय ४५).
Post a Comment
0 Comments