दिलीप वळसे पाटील परत आपल्या गुरुंच्या वाटेवर?
पुणे :- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोती बागेत जाऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती समोर आली असली तरी राजकीय वर्तुळात मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
रयत शिक्षण संस्थेबाबत ही बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले आहे. या भेटी दरम्यान दोघांमध्ये मात्र नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता कारण दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या सर्वात निकट असणारे नेते होते. शरद पवारांच्या सर्वात जवळचे म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली होती.
म्हणून वळसे पाटील यांनी अजित पवारांच्या गटात जाणं हा मुद्दा तेव्हा चांगलाच चर्चिला गेला होता. सध्या दिलीप वळसे पाटील हे विद्यमान सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्याच निमिताने वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची चर्चा आहे.
Post a Comment
0 Comments