Type Here to Get Search Results !

खिशातून पैसे काढणाऱ्याचा आला राग ; रागात तरुणाचा खून ; खराडी गावातील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक...

खिशातून पैसे काढणाऱ्याचा आला राग ; रागात तरुणाचा खून ; खराडी गावातील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक...

पुणे :- खिशातून ५०० रुपये काढल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

ही घटना ८ नोव्हेंबर रात्री एक ते ९ नोव्हेंबर सकाळी साडेनऊच्या दरम्यान खराडी येथील म्हसोबा मंदिराजवळ घडली आहे.

किरण अशोक साठे (वय-२४ रा. खराडी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी लोकेश रविंद्र पाटील (वय-२२ रा. पाटील वस्ती, केसनंद, पुणे) याच्यावर आयपीसी ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष मच्छिंद्र घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससून हॉस्पिटलमधील शवविच्छेदन अहवालात खून असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण साठे याने आरोपी लोकेश पाटील याच्या खिशातून गुपचूप ५०० रुपयेकाढून घेतले. याच कारणावरुन आरोपी लोकेश याने लाकडी बांबूने किरणच्या डोक्यात, हातावर व नाकावर मारहाण केली.यामध्ये गंभीर जखमी होऊन किरणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळीधाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून किरण साठेयाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.


Post a Comment

0 Comments