पिंपरी चिंचवड : बंद कंपनीच्या पाडणाचे काम सुरू असताना आग लागली; एकजण गंभीर जखमी...
पिंपरी : भोसरी येथील लांडेवाडी परिसरातील औरा आईस अँड कोल्ड स्टोरेज फॅक्टरीला आज (शनिवारी) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या तीन मजली फॅक्टरीला आग लागल्याने वर काम करत असलेल्या कामगारांनी खाली उड्या मारल्या.
औरा आईस अँड कोल्ड स्टोरेज ही फॅक्टरी गेले पाच वर्ष बंद असून त्या आधी ३० वर्ष ही कंपनी अस्तित्वात होती. या कंपनीच्या भिंतीवर अपग्रेडिंगचा बोर्ड देखील लावण्यात आला आहे. या बंद फॅक्टरीचे डिमॉलिश करण्याचे काम चालू असताना गॅस कटिंग करताना बंद कोल्ड स्टोरेज रूमच्या फोमला आग लागली असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व १४ कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी हजर झाले आहेत.
#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas
Post a Comment
0 Comments