Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

शरद पवारांच्या जवळचा नेता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता ? पुन्हा मोठा राजकीय धमाका होणार ?

शरद पवारांच्या जवळचा नेता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता ? पुन्हा मोठा राजकीय धमाका होणार ?

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) : राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशातच खुद्द जयंत पाटीलच वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी नेमकी कुणाची, यावरून काका-पुतण्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात त्याबाबतची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टातही आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यात आता एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटाकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


जयंत पाटलांच्या या दाव्याचा धुरळा खाली बसत नाही तोच अजित पवार गटाचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी खळबळ उडवून दिली. जयंत पाटील हेच आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट आत्राम यांनी केला. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आत्राम यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे.


सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही - अजित पवारांचा दावा...

आमदार अपात्रतेप्रकरणी 30 ऑक्टोबरला होणा-या सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. विधानसभा अध्यक्षांना केवळ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर करायला सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणावर अजून कोणतीही सुनावणी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दिल्लीतल्या नव्या राष्ट्रीय कार्यालयात शरद पवारांचा फोटो नाही

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दिल्लीतल्या नव्या राष्ट्रीय कार्यालयात शरद पवारांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो लावण्यात आलेत. दिल्लीतल्या 79 नॉर्थ एव्हेन्यूवर नवं कार्यालय सुरू करण्यात आलंय. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर कॅनिंग लेन मधलं कार्यालय काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर अजित पवारांना हे नवं कार्यालय देण्यात आलं.

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

Post a Comment

0 Comments