artik Aaryan, Tara Sutaria Dating?:बॉलिवुड अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तो बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे.
अल्पावधितच त्याने लोकप्रियता मिळवली आहे.
कार्तिक त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्तेत असतो. काही दिवसांपुर्वी त्याचे नाव सारा अली खानसोबत जोडले गेले होते.
मात्र आता सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो अभिनेत्री तारा सुतारियासोबत दिसत आहे. हे दोघे एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले.
कार्तिक आर्यन शनिवारी रात्री मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये तारा सुतारियासोबत दिसला होता.
ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले आहे. हे दोघे डिनर डेट गेले असल्याचे बोलले जात आहे.
कारमध्ये बसण्यापूर्वी दोन्ही स्टार्सनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर ते आपल्या कारमधून निघून गेले. यावेळी कार्तिकने काळी पँट आणि पांढरा शर्ट परिधान केला होता.
दरम्यान, तारा काळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि लेपर्ड प्रिंटेड साइड स्लिट स्कर्टमध्ये सुंदर दिसत होती. फ्री हेअरस्टाइल आणि हँडबॅग कॅरी करत ताराने तिचा लूक पूर्ण केला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचे चाहते त्यांची जोडी छान दिसत असल्याचे सांगत आहे. तर अनेकांनी दोघांमध्ये काय शिजत आहे असा प्रश्न विचारला आहे.
यापुर्वी तारा सुतारियाचे नाव रणबीर कपूरचा चुलत भाऊ आधार जैनसोबत जोडले गेले आहे. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2023 च्या सुरुवातीला त्याचे ब्रेकअप झाले.
तर कार्तिक आर्यनबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव सारा अली खानशी जोडले गेले. मात्र 2022 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले त्यानंतर पुन्हा त्याच्या पॅचअपच्या बातम्या पसरल्या होत्या. सध्या कार्तिक चंदू चॅम्पियनच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
तर दुसरीकडे कार्तिक आणि तारा हिट 'आशिकी' फ्रँचायझीच्या आगामी तिसऱ्या चित्रपटात एकत्र दिसणार अशी चर्चा आहे. 'आशिकी 3'मध्ये तारा ही मुख्य भुमिकेत दिसेल आणि या चित्रपटाची शुटिंग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे अशी चर्चा आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas
Post a Comment
0 Comments