चंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन...
पुणे :- शास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा देखील आहे. शास्त्रात ही घटना खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ३० वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे.
शास्त्रानुसार, ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरु होते. त्यामुळे याकाळात जास्तीत जास्त देवाच्या नावाचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात सर्वांनाच विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, विशेषतः गरोदर महिलांनी या काळात काही महत्वपूर्ण गोष्टींचे पालन करायला हवे.
चंद्रग्रहणात गरोदर महिलांनी हे नियम पाळावेत...
- चंद्रग्रहण सुरू होताच गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.
- शास्त्राच्या मान्यतेनुसार चंद्राची सावलीही गर्भात वाढणाऱ्या बालकावर पडू नये. त्यामुळे गर्भवती महिलांनी या काळात चंद्राकडे पाहू नये.
- ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी झोपू नये.
- या काळात गर्भवती महिलांनी केवळ देवाचे नामस्मरण, जप करावा. या काळात केलेल्या नामस्मरणाचे फळ अनेक पटीने मिळते.
- ग्रहण काळात केवळ सकारात्मक विचार करावा. घरामध्ये वाद-विवाद करु नये.
- या काळात तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे किंवा कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पठण करु शकता.
- ग्रहण सुरु झाल्यानंतर काहीही खाऊ नये. तसेच महिलांनी सुई, सुरी असे कोणतेही शस्त्र वापरू नये.
- या काळात गर्भवती महिलांनी मौन पाळावे. टी.व्ही, मोबाईल यांचा देखील वापर करु नये.
- चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना काळजी घ्यावी. महत्वाचे म्हणजे ग्रहण संपल्या नंतर गर्भवती महिलांनी स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे.
Post a Comment
0 Comments