Type Here to Get Search Results !

मला त्रास होतोय पोटात काही पण नाही ; जरांगे पाटील झाले भावुक...


मनोज जरांगे : मला त्रास होतोय पोटात काही पण नाही ; जरांगे पाटील झाले भावुक...
 

जालना, 28 ऑक्टोबर, सिद्धार्थ गोदाम : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते भावूक झाले. मला त्रास होत आहे. पोटात पाणी नसल्यानं अडचण येत आहे. पण माझ्या त्रासापेक्षा समाजाचा त्रास मोठा आहे, त्यामुळे मी माझ्या त्रासाकडे लक्ष देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. मराठी समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं, हे सरकारला माझं शेवटचं सांगणं आहे. संपूर्ण गावांनी उपोषणात सहभागी व्हावं. जीथे साखळी उपोषण सुरू आहे, तिथे अमरण उपोषण सुरू करा. उद्यापासून पाणी पेऊन उपोषणाला बसा, उद्यापासून हजारो लोक अमरण उपोषणाला बसतील. उपोषणात कोणाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments