Type Here to Get Search Results !

ट्रेडिंगच्या चक्रव्यूमध्ये फसण्या आधी सावधान; तुमच्यासोबतही हे घडू शकतं...



ट्रेडिंगच्या 
चक्रव्यूमध्ये फसण्या आधी सावधान; तुमच्यासोबतही हे घडू शकतं...

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मोहम्मद नासीर यांनी सुरू केलेली 'बाप ऑफ चार्ट' या फर्मने आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये खात्रीशीर रिटर्न कसे मिळवावे हे शिकवत असल्याचे मोठे दावे केले आहेत, पण प्रत्यक्षात मात्र असं नाहीये.

कारण ही फर्म तोट्यात आहे. त्यांनी आतापर्यंत ट्रेडिंगमध्ये जवळपास ३ कोटी रुपये गमावले आहेत.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या विश्लेषणावरून असं दिसून आलंय की फर्मचे मालक मोहम्मद नासीर व सोबतच्या काहींनी २.५ वर्षांच्या कालावधीत (जानेवारी २०२२ ते जुलै २०२३) स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करून सुमारे ३ कोटी रुपये गमावले आहेत.

"२००-३०० टक्के नफा किंवा जवळपास अश्युअर्ड रिटर्न देणार्‍या ट्रेडिंगसाठी स्ट्रॅटेर्जी देण्याचा दावा करणार्‍या नसीर यांनी सिक्युरिटीजच्या ट्रेडिंगद्वारे प्रत्यक्षात २,८९,६०,८२८.०२ रुपयांचा निव्वळ तोटा केला आहे. या संदर्भातील सर्व तथ्ये त्यांनी व्हिडिओ, वर्कशॉप्स, व इन्व्हेस्टर्स ग्रुप्सपासून लपवून ठेवली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रेडिंग कॉल्स/ एज्युकेशन व्हिडिओवरील रिटर्नच्या सर्टंटी किंवा निअर-सर्टंटीच्या दाव्याला त्यांच्या सिक्युरिटीज मार्केटमधील ट्रेडिंगच्या वैयक्तिक रेकॉर्डद्वारे सपोर्ट केला जात नाही," असं सेबीने त्यांना बाजारातून बंदी घालण्याच्या आदेशात म्हटलं आहे.

सेबीला मिळालेल्या माहितीनुसार, बाप ऑफ चार्ट व मोहम्मद नासीरची सात ट्रेडिंग खाती आहेत पण बहुतेक ट्रेडिंग फक्त दोन खात्यांमधून होतं. झिरोधा सोबतच्या ट्रेडिंग खात्यातून त्यांनी तब्बल २.६४ कोटी रुपये गमावले तर एंजल वन ट्रेडिंग खात्यातून आणखी २५ लाख रुपये गमावले. त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या नवोदित व्यापाऱ्यांकडून याच कालावधीत १७.२०  कोटी रुपये गोळा झाले. सेबीने नासीर यांना एस्क्रो खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. कारण ती रक्कम नोंदणी नसलेली आणि फसवी बेकायदेशीर अॅडव्हायझरी सर्व्हिस देऊन गोळा केल्याचा आरोप आहे. मनीकंट्रोलने सर्वांत आधी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या फसव्या अॅक्टिव्हिटींबद्दल तक्रार केली होती.

सेबीचे नियम अल्गो सेलर्सना भविष्यातील रिटर्नच्या कोणत्याही उल्लेखासह गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यापासून प्रतिबंधित करतात. परंतु मोठ्या संख्येने अल्गो विक्रेते सॉफ्टवेअर विक्रेते म्हणून काम करून रेग्युलेटरी निरीक्षण टाळतात. सेबीच्या १० पैकी नऊ व्यापाऱ्यांनी बाजारात पैसे गमावल्याचं समोर आलंय. यामध्ये स्वतःला प्रोफेशनल ट्रेडर्स म्हणवून घेणाऱ्यांचाही समावेश आहे.

Post a Comment

0 Comments