Type Here to Get Search Results !

Biggboss 17 Update ; मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा लव्ह स्टोरी ! Biggboss च्या घरात खुलतंय प्रेम, 'या' दोन स्पर्धकांच्या लव्हस्टोरी चर्चेत...

Biggboss 17 Update ; मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा लव्ह स्टोरी ! Biggboss च्या घरात खुलतंय प्रेम, 'या' दोन स्पर्धकांच्या लव्हस्टोरी चर्चेत...

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त रिॲलिटी शोची सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे. १५ ऑक्टोबरपासून 'बिग बॉस १७'ला सुरूवात झाली असून यंदाच्या सीझनमध्ये घरात १७ स्पर्धकांनी एन्ट्री केली.

कधी भांडण, कधी धमाल मस्ती तर कधी कोणाची काळजी घेणारे हे स्पर्धक सध्या त्यांच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आले आहेत.

'बिग बॉस 17' सुरू होऊन अजून एक आठवडा झाला नाही तोच या घरामध्ये लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि मनारा चोप्रा (Mannara Chopra) या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुलायला सुरुवात झाली आहे.

अनेक स्पर्धकांनी घरामध्ये एन्ट्री करताच आपल्या सहकाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली होती. त्यामध्ये मुनव्वर आणि मनाराचेही नाव आवर्जुन घ्यावे लागेल. पहिल्या दिवसापासून हे दोघेही एकमेकांना आपण किती चांगले आहोत हे पटवून देताना दिसत आहेत. 'बिग बॉस'ने कन्फेशन रूममध्ये बोलावल्यावरही ते एकमेकांचं नाव घेतल्यानंतर लाजताना दिसून आले. सध्या जरीही अशी चर्चा सुरु आहे, असं दिसत असलं तरी त्यांच्या लव्हस्टोरीची प्रचंड चर्चा होत आहे.

मनारा आणि मुनव्वरची लव्हस्टोरी जरीही नुकतीच सुरु झाली असली तरी, या कपलला नेटकरी 'ब्यूटी ॲंड ब्रेन कपल' म्हणून बोलत आहेत. मुनव्वर हा बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि महागडा स्पर्धक आहे. 'बिग बॉस 17'मध्ये मुनव्वर स्वत:ला टॉप ५ स्पर्धकांमध्ये त्याला त्याचे चाहते पाहत आहेत. त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर मुनव्वरने फक्त बिग बॉसच्या घरामध्ये स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, प्रेमात पडू नये, असा सल्ला सध्या चाहते देत आहेत.

मनारा आणि मुनव्वरची लव्हकेमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणतात, "मनारा आणि मुनव्वरला एकत्र पाहून खूपच मज्जा येणार आहे. हे दोघेही चाहत्यांचे चांगलच मनोरंजन करतील." तर आणखी एक युजर म्हणतो, " बिगबॉस सिजन 17 मध्ये आमचा पाठिंबा फक्त मुनव्वरलाच आहे, मुनव्वरला आणि मनाराला एकत्र पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे."

मुनव्वर या आधी कंगनाच्या 'लॉकअप'मध्ये होता. या कार्यक्रमातही मुनव्वरची एका स्पर्धकासोबत लव्हस्टोरी चर्चेत होती. त्या कार्यक्रमातून मुनव्वरची आणि अंजली अरोडाची लव्हस्टोरी चर्चेत आली. दरम्यान, आता मुनव्वरचं नाव मनारासोबत जोडलं जात आहे. मुनव्वर आणि मनाराचं नातं बहरणार की हा बिग बॉसचा प्लॅन आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मनारा ही अभिनेत्री आणि कॉमेडीयन असून प्रियंका चोप्राची ती बहीण आहे.

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

Post a Comment

0 Comments