वक्फ बोर्डाचे संभाजीनगर मधील आलिशान हॉटेल मध्ये 3 दिवसीय बैठक संपन्न ; माध्यमांना माहिती न देताच गुंडाळली बैठक ; काय चाललंय तरी काय वक्फ बोर्डात ?
नेहमी बैठक संपल्यानंतर वक्फ बोर्डाचे चेअरमन माध्यमांना निमंत्रित करुन सविस्तर माहिती देत असतात. परंतु यावेळी पत्रकार परिषद न घेता बैठक गुंडाळली यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील वक्फ मालमत्ता, मालमत्तेचे वाद विवाद, उत्पन्न, नवीन संस्था नोंदणी, कर्मचारी भरती विविध समस्या व उपाययोजना वर माहिती दिली जाते. हजारो एकर जमीन वक्फ बोर्डाची असताना भाड्याने हाॅटेलमध्ये लाखो रुपये खर्च करून बैठक घेतली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रकरणी काही लोकांनी वक्फ बोर्डाच्या चेअरमन यांना निवेदन दिले.
कोणते गुप्त ठराव घेतले याची माहिती सुध्दा माध्यमांना दिली नाही... गेल्या काही महिन्यांपासून नविन सीईओ आल्यावर वक्फ बोर्ड चांगलेच एक्शन मोडमध्ये आले आहेत. अपेक्षा वाढलेल्या आहेत पण यावेळी असे काय घडले ते ते चित्र अजून स्पष्ट दिसत नाहीये. यामुळे सभ्रम निर्माण झाला आहे.
वक्फ बोर्डाच्या चेअरमन यांच्या कामावर प्रश्नचिन्ह?
वक्फ बोर्डाचे चेअरमन वजाहत मिर्झा यांच्या अश्या कामामुळे त्यांच्या वर आरोपांना सुरुवात झाली आहे. अनेकांनी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एवढ्या गोपनियतेत का घेतली गेली बैठक ? वक्फ बोर्डात नेमकं चाललंय तरी काय ? आणि एवढ्या भल्या मोट्या मालमत्ता असताना का त्यांना घ्यावी लागली आलिशान हॉटेल मध्ये बैठक ? असे अनेक प्रश्न त्यांच्यावर उपस्थित केले जात आहे. नेमक पडद्यामागे चाललंय तरी काय हेच कळेनासा झाले आहे.
याबाबत वक्फ बोर्डाच्या चेअरमन डॉ वजाहात मिर्झा यांना संपर्क केला असता यांचा संपर्क होऊ शकला नाही.
#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas
Post a Comment
0 Comments