Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

मनोज जरांगे पाटील आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

मनोज जरांगे पाटील आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

पुणे (प्रतिनिधी जैद खिल्लेदार) :- मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील काही गावांना भेटी देत राजगुरुनगर येथे त्यांची सभा होणार आहे.


या सभेला मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसली असून ते संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करताना दिसत आहेत. आज ते पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राजगुरुनगर येथे त्यांची सभा होणार आहे. 5 लाख मराठा बांधव या सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

या सभेसाठी 100 एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली. या ठिकाणी कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर हीट असल्यामुळे तशा उपाययोजना सभास्थळी करण्यात आल्याची माहिती आहे.

असा असेल मनोज जरांगे पाटील यांचा पुणे दौऱा...

  • सकाळी सात वाजता जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे.
  • 10 वाजता जुन्नरला भेट देणार.
  • सकाळी 11 वाजता खेड राजगुरुनगरमध्ये सभा.
  • 3 वाजता बारामतीत तीन हत्ती चौकात सभा.
  • 5 वाजता फलटणला भेट देणार.
  • 8 वाजता दहिवडीत भेट देणार.

Post a Comment

0 Comments